नवोदय विद्यालयामध्ये पार पडली २६ वी युवा सासद राष्ट्रीय प्रतियोगिता
पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथिल पीएमसी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये दिनांक ०४/०२/२०२५ ला २६ वी युवा संसद राष्ट्रीय प्रतियोगिता संपन्न झाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार रामटेक विधानसभा व विधान परिषदेचे सदस्य कूपाल तुमाने, डेप्युटी सेक्रेटरी संसदीय कार्य मंत्रालय नवी दिल्ली, श्रीमती संगीता जयस्वाल असिस्टंट कमिशनर नवोदय विद्यालय समिती नोएडा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.
कार्यक्रमांची सुरुवात सरस्वती च्या प्रतीमेला माला अर्पण करून व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.यावेळी पीएम जे.एन. व्हि. मेदक सिद्धपेठ तेलंगणा ,पीएम.जे.एन. व्हि. वलसाड गुजरात च्या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये संसदेचा हुबेहूब देखावा निर्माण केला. यामध्ये लोकसभा अध्यक्ष पक्ष विपक्ष मंत्री विभिन्न प्रदेशांच्या वेशभूषेत असलेले सासद सदस्य पाहायला मिळाले या सासद सदस्यांनी आपापल्या प्रदेशाचे प्रश्न देशांचे प्रश्न यावर सविस्तर चर्चा केली.
या कार्यक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संसदीय कार्य प्रणाली ची शिकवण राष्ट्रीय एकात्मता वाढविणे नेतूत्व क्षमता वाढविणे हे आहे. कार्यक्रम यशस्विकरणया करीता जे एन व्हि वलसाड गुजरात,चेशिक्षकदिनेश पांडे,उदय तायडे,देवीदयाल,श्रीमती नीलम, श्रीमती जोत्सना दिवेदी, तसेच पीएमसी जे एन व्हि मेढक चे शिक्षक भास्कर,श्री.सुसान इत्यादींनी परिश्रम घेतले.
कूपाल तुमाने म्हणाले की जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी मोठे झाल्यानंतर मी त्यांना संसदेत बोलणार असे वाटते ते म्हणाले तसेच देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रत्येक तरुणाने राज कारणात येणे आवश्यक आहे. असेही ते म्हणाले.
कार्यक्रमा करीता विद्यालयाच्या प्राचार्या डाक्टर झरीना कुरेशी,उस्तू देऊरमाले,जी.एस.भुजबळ, निलेश गजभिये, नितेश मालवीय, श्रीमती सुनीता देव ,श्रीमती कमला दायदार, आनंद थुल आणि गुरुदेव कोरचे इत्यादी नी परिश्रम घेतले.
ढवलापुर प्रतिनिधी निर्मला मरकाम
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time